महाराष्ट्र

गेवराईत गौराईंसमोर साकारला जगन्नाथ प्रभूंच्या रथयात्रेसह मंदिराचा सुंदर देखावा ————— देखावा साकारण्यासाठी झंवर परिवाराने घेतली पंधरा दिवस मेहनत

भारतीय संघर्ष न्यूज नेटवर्क महाराष्ट्र.....

गेवराई /विष्णु राठोड
गौरी गणपती सणानिमित्त सध्या सर्वत्र धार्मिक आणि उत्साहाचे वातावरण आहे. महालक्ष्मी (गौरी) सणादरम्यान घराघरांमध्ये विविध धार्मिक, सामाजिक किंवा पौराणिक विषयांवर आधारित आरास देखावे मांडण्याची मोठी परंपरा आहे. दरम्यान शहरातील युवा उद्योजक रोहन श्यामसुंदर झंवर यांनी त्यांच्या निवासस्थानी भगवान जगन्नाथ प्रभूंच्या रथयात्रेसह मंदिराचा सुंदर असा मनमोहक देखावा साकारला असून जगन्नाथांचा देखावा पाहण्यासाठी सध्या महिला मंडळींसह परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळते आहे. तर देखावा साकारण्यासाठी झंवर परिवाराने यासाठी पंधरा दिवस मेहनत घेतल्याचे सांगितले.
गेवराई शहरातील युवा उद्योजक रोहन श्यामसुंदर झंवर यांनी गौरी गणपती सणानिमित्त त्यांच्या निवासस्थानी गौराईंसमोर भगवान जगन्नाथांचा सुंदर आणि मनमोहक देखावा साकारला असून हा देखावा एक अत्यंत भक्तीमय आणि कल्पक उपक्रम ठरला असून त्यांनी ओडीसा राज्यातील जगप्रसिद्ध असलेल्या जगन्नाथ पुरीच्या जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती तसेच भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र यांचा देखावा साकारुन भक्तांना भगवान जगन्नाथांचे दर्शन घडविले. यामध्ये मंदिर, भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा माता यांच्या तालध्वज, नंदीघोष आणि दर्पदलन या रथाची हुबेहूब प्रतिकृती पाहायला मिळाली तसेच जगन्नाथ वस्त्र भंडार, प्रसादालय, महाप्रभू भोग यासह बलभद्र, सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ प्रभू यांचा हुबेहूब देखावा साकारला हा देखावा सुंदर वास्तुकला मंदिराची कलाकुसर आणि सजावट अगदी बारकाईने उभी करण्यात आली होती. यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून यानिमित्ताने भगवान जगन्नाथांचा देखावा येथे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button