श्री, प्रवीण खाडे सर,
कल्याण प्रतिनिधी,
अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याणच्या शैक्षणिक उपक्रम शाखा आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र खेडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून

बोलत होते , ते पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. असं काम केले पाहिजे ,अशी भरारी घेतली पाहिजे की आई-वडिलांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे. आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात तुमच्याविषयी अभिमानाची आनंदाची चमक दिसली पाहिजे. आई-वडिलांच्या डोळ्यातील चमक पाहण्यासाठी प्रयत्न करा, प्रेयसीच्या नाही. असे स्पष्टमत मांडले .
यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी मुक्त संवाद साधून प्रेरणा देणाऱ्या काही सिनेमांची उदाहरणे देऊन त्यांना बोलते केले. यावेळी त्यांनी सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांचे दुष्परिणाम या बाबत माहिती देऊन जनजागृतीही केली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक श्री मारुती आंधळे ,आदर्श करिअर पॉईंट, नाशिकचे संचालक श्री गोरक्ष सांगळे ,

अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड,
कार्याध्यक्ष
ज्ञानेश्वर धात्रक
सरचिटणीसअर्जुन डोमाडे आणि कोषाध्यक्ष प्रा. रामनाथ दौंड व्यासपीठावर उपस्थित होते. मारुती आंधळे यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यां समोर प्रेरणादायी विचार मांडले. त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमात “दहावी बारावी नंतर काय ? ” या विषयावर श्री गोरक्ष सांगळे यांनी स्पर्धा परीक्षा आणि अभ्यासाचे तंत्र या विषयावर योग्य ते मार्गदर्शन केले. सदर वेळी इयत्ता दहावी, बारावी, पदवी , आणि पदवितर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याच प्रमाणे
सौ जयश्री दौंड आणि श्री दिगंबर पालवे या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्मृतिचिन्ह मानपत्र आणि शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून
मानपत्राचे वाचन प्रा.अर्जुन उगलमुगले आणि सौ निकिता उगलमुगले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैक्षणिक उपक्रम शाखेच्या अध्यक्षा सौ चंद्रकला दराडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शरद पालवे यांनी केले . कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुर ताल करावके ग्रुप कल्याण यांनी आषाढी एकादशी निमित्त अभंग वाणी हा विठ्ठल भक्ती गीतांचा सुरेल कार्यक्रम सादर केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा समन्वयक श्री आत्माराम फड सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री अर्जुन उगलमुगले, माधव दराडे, अनिल दौंड , सौ.स्वाती यलमामे , सौ.मीनल दराडे , सौ.यशोदा आव्हाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
Back to top button
