घरकुल लाभार्थ्याकडून तलवाडा ग्रामपंचायत मध्ये आर्थिक लूट ? पी टी आर च्या नावाखाली पाचशे तर ऑनलाइन करण्यासाठी शंभर रुपये वसूल करत असल्याची गावात चर्चा माजी उपसरपंचाला ग्रामसेविकेची मग्रूरीची भाषा;कुठे तक्रार करायची ते करा माहिती विचारणाऱ्या पत्रकाराला उडवा उडविली उत्तरे….
सर्व सामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळावे या उद्देशाने केंद्र आणि राज्य शासन घरकुल योजना आमलात आणत असून ज्या सामान्य नागरिकांना घर नाही अशा नागरिकांचा मागील दहा ते अकरा महिन्यापूर्वी सर्वे करण्यात आला होता,यावेळी सेल्फ सर्वे देखील करून घे यात आला होता या सर्वांच्या याद्या पंतप्रधान आवास योजना या नावाने प्रसिद्धी झाल्या असून प्रत्येक ग्रामपंचायत ला प्राप्त झाल्या आहेत.या घरकुल लाभार्थ्यांना सहकार्य करून त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्याची ग्रामीण भागात ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी आहे.परंतु तलवाडा याठिकाणी या यादीतील लाभार्थ्याकडून आर्थिक लूट करण्यात येत असल्याची चर्चा तलवाडा गावात जोर धरत असून यादीतील लाभार्थ्याकडून पी टी आर देण्याचा धाक दाखवून पाचशे रुपये तर ऑनलाइन करावयाचे म्हणून चक्क शंभर रुपये घेत असल्याचे समोर आले असून याबाबत तलवाडा ग्रामपंचात चे माजी उपसरपंच यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून रोष व्यक्त केला आहे.तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी बोलतांना सांगितले.
या बाबत सविस्तर असे की,गेवराई तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते याठिकाणी साध्य कार्यकारी मंडळ बरखास्त असून प्रशासक नेमलेले आहे.त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये हम करे सो कायदा या प्रमाणे ग्रामसेवक आणि प्रशासक काम करत असून सध्या पंतप्रधान आवास योजनेच्या याद्या प्रसिद्ध झाल्यापासून पुन्हा ग्रामपणाचत चा कारभार चर्चेत आला आहे.सामान्य लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासन पर्यत्न करत आहेत तर दुसरीकडे याच शासनातील जबाबदार कर्मचारी सामान्य लाभार्थ्यांची आर्थिक लूट करत असल्याचे समोर येत आहे.सध्या पाऊस नसल्याने शेतकरी,मजूर,सामान्य जनता हवालदिल झाली आहे त्यांना कुटुंब उदरनिर्वाह कसा करायचा याची चिंता भेडसावत असताना त्यांची अशी लूट होणे अन्यायकारक आहे.तलवाडा ग्रामपंचात अंतर्गत जवळपास आठरासे पन्नास लाभार्थ्यांचे नाव पंतप्रधान आवास योजनेच्या यादीमध्ये आले असून 15 ऑगस्ट रोजी यादीची माहिती गावकऱ्यांना दिल्या नंतर त्यांना यासाठी सहकार्य करणे आवश्यक होते परंतु तलवाडा ग्रामपंचायत च्या ग्रामसेवक आणि प्रशासक यांनी याच लाभार्थ्यांना आर्थिक त्रास देऊन त्यांना तुम्हाला पी टी आर साठी पाचशे रुपये द्यावे लागतील तसेच ऑनलाईन करण्यासाठी शंभर रुपये लागतील असे सांगून पैसे जमा करण्याचा फंडा चालवला आहे. ज्या लाभार्थ्यांच्या नावावर जगा आहे त्यांना पैसे भरून पावत्या देण्यात येतात परंतु ज्याच्या नावावर जगा नाही आणि त्याचे नाव यादीत आहे अशा लाभार्थ्यांची पैसे भरून घेऊन पावत्या देण्यात येत असल्याची चर्चा झाली.
याची माहिती मिळताच ग्रामपंचात चे माजी उपसरपंच आक्रम सौदागर आणि पत्रकार डॉ.सुरेश गांधले यांनी विचारणा केली असता ग्रामसेवक यांनी उपसरपंच यांना मग्रूरीची भाषा करत कुठे तक्रार करायची ते करा असे उलट उत्तर दिले तर पत्रकार गांधले यांना उडवा उडविली उत्तरे दिली. सामान्य नागरिकांना आपल्याला घर मिळावे या आशेने अडचणी असताना ही पैसे भरत असून आहे ऑनलाइन करणार नाहीत या भीतीपोटी शंभर रुपये देत आहेत.तर काही नागरिकांनी या ग्रामपंचायत कारभाराच्या विरोधात रोष व्यक्त केला असून गटविकास अधिकारी यांना संपर्क साधण्याचा पर्यत्न केला परंतु त्यांचा दूरध्वनी बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही तर अनेक जणांनी लोकप्रतिनिधी यांना फोन लावून याबाबत माहिती देवून सामान्य माणसाची होणारी अडवणूक थांबवावी अशी मागणी केली आहे.