बीड /गेवराई:- (प्रतिनिधी) :- विष्णू राठोड
बीडजिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील- ऊसतोड हंगाम चालू झाल्याने अपघाताचे प्रमाणं वाढत असल्याने प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिसांनी लक्ष घालून भिगवण परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक व मालकांनी वाहतुकीदरम्यान विशेष काळजी घ्यावी असे आवाहन
बंजारा बीग्रेड बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा पत्रकार विष्णु राठोड यांनी केले आहे. ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीवरील साऊंडचा आवाज मोठ्या प्रमाणात असल्याने ट्रॅक्टर चालकाला मागून येणाऱ्या वाहनांचा सुगावा लागत नाही, वाहनांना मागे रिप्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळी अपघात घडतात यामुळे संबंधित परिवहन व पोलिस विभागाने वाहन चालकांना जनजागृती कार्यक्रम घ्यावेत अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण वाघ यांनी केली आहे.
वाहन चालकांच्या चुकीचा त्रास शेतकरी, ग्रामस्थ व रस्त्यावरील इतर वाहन चालकांना होतो यामुळे साऊंडचा आवाज कमी ठेवून ध्वनिप्रदूषण टाळावे, नियमबद्ध वाहन चालवावे अशी देखील मागणी नागरिकांनी केली आहे. परिसरातील साखर कारखान्यांच्या प्रशासनाने व संचालकांनी ट्रॅक्टर व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे गरजेचे आहे. रात्रीच्या वेळी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना ट्रॅक्टर व ट्रॉली स्पष्टपणे दिसाव्यात, यासाठी रेडियम लावल्यास अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होईल.
रस्त्यावर ऊसाची मोळी, ऊसाचे तुकडे किंवा इतर अवशेष पडत असल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ऊस वाहतूक करताना रस्त्यावर कोणताही कचरा किंवा ऊसाचे अवशेष पडणार नाहीत, याची चालक-मालकांनी दक्षता घ्यावी.
नागरिकांचे आवाहन
साखर कारखानदार यांनी पुढाकार घेऊन जनजागृती करावी, सुरक्षा रक्षक ठेवावेत यासह वेळोवेळी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी तपासणी करावी, पोलिसांच्या मदतीने ऊस वाहतूक सुरळित करावी जेणे करून शेतकरी ग्रामस्थ कारखानदार यांना मदत होईल व पूर्ण हंगाम व्यवस्थित पार पडेल याची काळजी घ्यावी.
Back to top button
