गेवराई ! विष्णु राठोड
तलवाडा येथे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्कल प्रमुख विनोद आठवले यांनी टॉवरवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात आवाज उठवत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे तलवाडा सर्कल प्रमुख विनोद आठवले यांनी तलवाडा ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभारा विरोधात दि.२४.सप्टेंबर रोजी प्रतिकात्मक अंत्यविधी पद्धतीने अनोखे आंदोलन केले होते.परंतू या अंदोलनाची दखल न घेतल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे तलवाडा सर्कल प्रमुख विनोद आठवले यांनी पप्पूजी कागदे यांच्या नेतृत्वाखाली टावर वर चढुन शोले स्टाईल नें आज अगळे वेगळे आंदोलन करून शासनाच्या प्रतिनिधि ला घाम फोडत आपल्या अंदोलनाच्या मागनीला यश मिळवले.

ग्रामपंचायतीच्या कामकाजातील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवरील प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, यासाठी रि.पा.ई.चे सर्कल प्रमुख विनोद आठवले यांनी टॉवरवर चढून आंदोलन केले.
या अनोख्या आंदोलनामुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले होते, ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत या आंदोलन स्थळी उलट सुलट चर्चा झाली आहे. संबंधित आरोपांची सत्यता तपासून प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.तलवाडा ग्रामपंचायत आंदोलन प्रकरणी तलवाडा येथे.विस्तार अधिकारी राठोड,उनवनेणे यांनी आंदोलन स्थळी तक्रारधारकांशी दुरध्वनी वर संपर्क केला असता सविस्तर चर्चा करूण आम्ही जिल्हा स्तरीय समिती नेमनुक करून चोकशी करू व दोषिंवर योग्य ती कार्रवाई करू असे असवासन दिल्या नंतर विनोद आठवले टावर वरून खाली उतरे व त्यांना तसे लेखी दिले.
या आंदोलन स्थळी वडार समाज चे तालुका अध्यक्ष राजेंद्र विटकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवाजिल्हाअध्यक्ष शेख खिजर भाई,बाळू डहाळे, जयदेव शिंगणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला तालुका अध्यक्ष सुनिता भाभी गिल, पञकार बांधव व गावकरी या आंदोलन स्थळी उपस्थित होते.तलवाडा पोलीस स्टेशन चे बिट अमलदार देवकते व काॅस्टेबल अबुज यांनी आंदोलन स्थळी चोख बंदोबस्त करत शांततेत आंदोलन पार पाडले.
Back to top button
