महाराष्ट्र

तहसीलदार आणि BDO च्या आदेशाला केराची टोपली ! चकलांबा ग्रामपंचायतीची मुजोरी, अमीरबाबा दर्ग्यात पाणी देण्यास नकार – हुकूमशाही कारभारावर भाविक संतप्त

भारतीय संघर्ष.......

विष्णु राठोड,

गेवराई :-(प्रतिनिधी) चकलांबा ग्रामपंचायत ची हुकूमशाही कडे वाटचाल! अमीरबाबा दर्ग्याच्या आठवडी एका खेप टँकर टाकण्याचे BDO चे आदेश, तरी चकलांबा ग्रामपंचायतचा नकार गटविकास अधिकारी साहेब तुमची दिशाभूल करणाऱ्या चकलांबा ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांना तात्काळ निलंबन करा भक्ताची मागणी,

निर्भीड पत्रकार संघाचे पदाधिकारी लवकरच घेणार जिल्हाधिकारी साहेबांची भेट चकलांबा ग्रामपंचायत च्या मनमानी कारभार विरोधात करणार तक्रार अशा हुकूमशाही करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासक ग्रामपंचायत बॉडी जे वरिष्ठांचे आदेश धुडकावून लावतात अशी हुकूमशाही करणारी ग्रामपंचायत बरखास्त करण्याची करणार मागणी

चकलांबा !असलम कादरी

चकलांबा ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार चव्हाट्यावर – BDO साहेबांच्या लेखी आदेशानंतरही अमीरबाबा दर्ग्याला पाणी नाही, चकलांबा ग्रामपंचायतची हुकूमशाही कडे वाटचाल तहसीलदार मॅडम काय कारवाई करणार याच्याकडे तालुक्याचे लक्ष
गेवराई तालुक्यातील चकलांबा ग्रामपंचायतीच्या हुकूमशाही आणि मुजोर कारभाराचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. अमीरबाबा दर्ग्यातील पाणी टंचाई संदर्भात सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार असलम महेबुब सय्यद यांनी दि. 14/10/2026 रोजी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत तहसीलदार आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) यांनी चकलांबा ग्रामपंचायतीला लेखी आदेश देऊनही, ग्रामपंचायतीने त्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे
चकलांबा येथील प्रसिद्ध अमीरबाबा दर्ग्यात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण होती. याबाबत असलम सय्यद यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत *पंचायत समिती, गेवराईचे गटविकास अधिकारी यांनी जा.क्र. 3495 / दि. 16/10/2026 अन्वये* चकलांबा ग्रामपंचायतीला स्पष्ट आदेश दिला की, “आपल्याला मंजूर असलेल्या टँकरपैकी 1 खेप पाणी नियमानुसार तात्काळ अमीरबाबा दर्ग्यात टाकावे आणि त्याचा अहवाल सादर करावा.”
आदेश येऊनही पाणी नाहीच
BDO साहेबांचा हा लेखी आदेश येऊन 2 दिवस उलटले तरी चकलांबा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी दर्ग्यात एक थेंबही पाणी टाकले नाही. हा थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान असून, ग्रामपंचायतीची मुजोरी आणि हुकूमशाही प्रवृत्ती यातून दिसून येते.
एका धार्मिक स्थळाला, जिथे दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात, तिथे पाणी नाकारणे हे अत्यंत निंदनीय आहे. तहसीलदार मॅडम आणि BDO साहेबांच्या आदेशालाच जर ग्रामपंचायत जुमानत नसेल, तर सामान्य जनतेचे काय होणार? असा सवाल भाविक आणि ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.

आता कारवाईकडे लक्ष

या प्रकरणी निर्भीड पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्ष देवेंद्र ढाका यांनी पुन्हा वरिष्ठांकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता तहसीलदार मॅडम आणि BDO साहेब चकलांबा ग्रामपंचायतीच्या या मुजोरीवर काय कारवाई करणार? सरपंच आणि ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई होणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतीने तात्काळ दर्ग्यात पाणी न टाकल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही भाविकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button