महाराष्ट्र

जिनिअस इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे द्विपात्री प्रयोगात आंतरराष्ट्रीय यश

भारतीय संघर्ष........

 

बीड! विष्णु राठोड
, दि. २८ (प्रतिनिधी)
विश्व हिंदी सचिवालय
भारत व मॉरिशस सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय हिंदी स्पर्धा हिंदी दिवस २०२६ नुकतीच संपन्न झाली. ही स्पर्धा भारतासह आशिया, मध्य आफ्रिका, अमेरिका, ऑस्टिलिया आणि युरोप देशात नियोजित होती. या स्पर्धेत बीड येथील जिनिअस इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. मुन्शी प्रेमचंद लिखित कथानकावर आधारित दोन पात्रातील संवाद कु. निर्जरा देशपांडे आणि चि. स्वानंद होळकर यांनी सादर केला होता. जिनिअस इंग्लिश स्कूल, बीड शाळेस या आंतरराष्ट्रीय नाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला असून बक्षिसाचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, व १०० अमेरिकी डॉलर रक्कम असे आहे. याचे लेखन, दिग्दर्शन व चित्रिकरण शाळेच्या प्राचार्या पल्लवी देशपांडे यांनी केले. तर एडिटिंग प्रीती गोरे यांनी केले. निलेश बुंदेले यांनी तांत्रिक साहाय्य केले.
आंतरराष्ट्रीय नाट्य संवाद स्पर्धेत यशस्वी कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यास उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक करून अभिनंदन केले.
भविष्यातही अशा प्रकारच्या अनेक संधी आपण विद्यार्थ्यांसाठी निर्माण करणार आहोत असे प्राचार्यांनी सांगितले. यशस्वी विद्यार्थी तसेच त्यांचे पालक यांचा कार्यक्रमात यथोचित सन्मान करण्यात आला.
शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक व यशस्वी विद्यार्थ्यांचे, प्राचार्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन शाळेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देशपांडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button