महाराष्ट्र

महिला महाविद्यालयाचे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर.

भारतीय संघर्ष......

गेवराई दि.२४ (प्रतिनिधी) ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवातून समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे ज्येष्ठांच्या
आरोग्याची काळजी घेणे व त्यांचा सन्मान राखणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन श्रीराम आरगडे यांनी केले. ते महिला महाविद्यालय, गेवराई येथील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने रानमळा येथे आयोजित ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालय गेवराई, च्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने मौजे रानमळा येथे जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उद्घाटकीय भाषणात जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. श्रीराम आरगडे म्हणाले की, समाजातील ज्येष्ठांनी आयुष्यभर कुटुंब आणि समाजासाठी हाल-अपेष्टा सोसलेल्या असतात. त्यांच्या अनुभवाचा उपयोग युवक व ज्येष्ठांना झाला पाहिजे. त्यामुळे त्याची जाणीव ठेऊन त्यांचे आरोग्य व सन्मान जपणे ही काळाची गरज आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र निपाणी जवळका चे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत भोसले यांनी उपस्थित ज्येष्ठांशी संवाद साधत बीपी, सुगर, संशयित कर्करोग, क्षयरोग इ. आजाराची लक्षणे व उपचार याविषयी माहिती दिली. रानमळा-भाटेपूरी ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच बळीराम चव्हाण म्हणाले की, महिला महाविद्यालय व आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित या शिबिरामुळे गावातील जेष्ठ नागरिकांना आपल्या गावातच आरोग्य तपासणी करता येत आहे. ही आपल्या गावासाठी चांगली गोष्ट आहे. ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तात्याराम सोंडगे म्हणाले की, ग्रामीण भागातील वृद्धांमध्ये आरोग्याच्या बाबतीत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात आरोग्य तपासणी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर च्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या निर्देशानुसार ज्येष्ठ नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करुन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. गावातील जेष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

या शिबिरामध्ये ७५ जेष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. तपासणी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शरद पवार, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी गायकवाड, श्री. गणेश तांबोळकर, श्री. भीमराव मोरे, श्रीमती सुरेखा कानडे, श्रीमती अर्चना होनमाने यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दत्ता तंगलवाड यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. डॉ. रामहरी काकडे यांनी केले तर प्रा. डॉ. राजाभाऊ चव्हाण आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. शिवाजी दिवाण व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या शिबिरामध्ये गावातील माजी सरपंच सुधाकर नागटिळक, रामनाथ हिंगे, बाबुराव जाधव, दादाराव हिंगे, बाबुराव निकम, नारायण मोरे, गणेश मोरे, लक्ष्मण हिंगे, दत्तात्रय हिंगे, राजेंद्र हिंगे, मोहनराव जाधव, अशोकराव वाघ, प्रल्हाद हिंगे, राजाभाऊ सांगडे, आसाराम मुळक, रावसाहेब मोरे, संदीप हिंगे, सदाशिव वाघ, एकनाथ निकम, उद्धव जाधव, गिताराम निकम यांच्यासह जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button