महाराष्ट्र

छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील बनवाडी तांडा येथे बंजारा ब्रिगेडचे शाखा अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न

भारतीय संघर्ष न्यूज नेटवर्क महाराष्ट्र

बीड! गेवराई -विष्णु राठोड

बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जटवाडा सर्कल मध्ये पहिल्या शाखेचे अनावरण करताना मागील १० ते १५ वर्षापुर्वीच्या केलेल्या कार्याची आठवण करतानाचा बनवाडी तांडा ही स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आल्याने १० वर्षापूर्वी पहिलेले स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद नक्कीच आहे हे आवर्जून सांगायला रविकांत भाऊ विसरले नाही. त्याच बरोबर बंजारा तांड्यांच्या विकास जर घडवून आणायचा असेल तर महाराष्ट्रातील सर्व तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा मिळायला पाहिजे हे ही तेवढेच महत्वाचे असून बंजारा समाज तांडा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर बंजारा ब्रिगेड या सामाजिक संघटना व संघटनेचे पदाधिकारी यांना साथ दिले पाहिजे असेही
रविकांत भाऊ यांनी यावेळी बोलतांना सांगितले.


मोठ्या उत्साहात संपन्न झालेला या शाखा अनावरण कार्यक्रमाला बंजारा ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ राठोड, विभागीय उपाध्यक्ष विजय भाऊ राठोड, जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ पवार, युवा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ चव्हाण, तालुका अध्यक्ष योगेश भाऊ चव्हाण, अमोल भाऊ राठोड, रितेश भैया राठोड यांच्या सह शाखा पदाधिकारी व तांड्यातील नागरिक तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button