बीड :-(प्रतिनिधी) : यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यावर पिकावर येऊन ठेपला आहे शेतकऱ्यांनी पेरलले पीक सुद्धा उगवले नाही व पाण्याअभावी जळून गेले आहे बळीराजा जगला तर सर्वसामान्य माणूस जगला असे शब्द बोलले जात आहे हे खरे आहे परंतु आज दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे या दुष्काळ परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवाभाऊ तुम्ही जसे उभे राहिले आहे जसे कि शेतकऱ्यांची कर्ज माफी व असे अनेक प्रश्न सोडवण्याची आपण घोषणा केली आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील हातावर पोट भरणाऱ्या कष्टकरी भूमिहीन सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानावर मोठा परिणाम झाला आहे दुष्काळाचा फटका खरा गरीब कुटुंबावर झाला आहे पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला काम नाही काम नसल्यामुळे या कष्टकरी भूमीहिनावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. खरोखरच ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे तसेच शेतकऱ्यांच्या जनावरांचे देखील चाऱ्या अभावी बेहाल झाले आहे मुक्या जनावरांना चारा नाही अनेक भागात प्यायला पाणी नाही उष्णतेची लाट पसरली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांजवळ पैसा आला तर बाजारपेठेत पैसा फिरतो हे सत्य परिस्थिती आहे परंतु आज शेतकरी राजाच दुष्काळ परिस्थितीत अडकला असल्यामुळे सर्वसामान्य भूमिहीन मजुरावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्याच्या आपण ज्या सवलती दिल्या आहेत त्याच प्रमाणे भूमीहिनांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी भूमिहीनांच्या उदरनिर्वाहासाठी आपण प्रशासनाच्या माध्यमातून काही उपाययोजना कराव्यात आणि भूमिहीन कष्टकरी वर्गाला न्याय देऊन त्यांच्याही पाठीशी खंबीरपणे उभे राहाल अशी भूमिहीन वर्गातून चर्चा होत आहे त्याचबरोबर एकीकडे पावसाने फटका दिला दुसरीकडे महागाईच्या भडक्यामुळे गोरगरीब जनता बेहाल झालेली आहे आपण ज्या भागात दुष्काळ जाहीर केले आहे त्या त्या तालुक्यातील सर्वसामान्य भूमीहिन कष्टकऱ्यांचा विचार करावा हे अत्यंत गरजेचेआहे. अनेक कुटुंब ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शहरी भागाकडे जातानाचे चित्र पाहावयास मिळत आहे आपल्या कुटुंबाच्या उपजीविकासाठी घर सोडावे लागत आहे. पाण्याची टंचाई झाल्यामुळे बांधकाम सुद्धा ग्रामीण भागात बंद पडत आहे. भूमीहिन साठी एकही लोकप्रतिनिधी आवाज उठवायला तयार नाही मग नेमके भूमीहीन नी कसे जगावे त्यांच्या पाठीशी कोण उभे राहणार याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
दुष्काळी ग्राउंड रिपोटीग
शब्द संकलन
पत्रकार आल्ताफ कुरेशी
मु.पो. तलवाडा. तालुका गेवराई जि बीड
Back to top button
