महाराष्ट्र

पुणे बेंगलोर महामार्गावर शिरवळ येथे भीषण अपघात; चार युवकांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

भारतीय संघर्ष न्यूज....

 

शिरवळ, दि. ११ ऑगस्ट २६: पुणे-सातारा महामार्गावरील शिरवळ येथे मंगळवारी (११ ऑगस्ट) पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव टाटा नेक्सॉन कार डिव्हायडरला धडकून पलटी झाल्यानंतर विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन आयशर ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात चार युवकांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत.

हा अपघात पहाटे सुमारे १.१० वाजण्याच्या सुमारास NH-48 वरील सातारा–पुणे लेनवर, शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर घडला. प्राथमिक माहितीनुसार, टाटा नेक्सॉन (MH 14 LJ 3033) ही कार पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार प्रथम डिव्हायडरला धडकली आणि पलटी झाली. त्यानंतर कार विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन आयशर ट्रकला (KA 27 C 5878) धडकली.

या भीषण अपघातात वेदांत अर्जुन वारिंगे (१९, तळेगाव दाभाडे), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (१९, कामशेत), आदित्य बाळासाहेब गरुड (१९, टाकवे) आणि निखिल बाळू राऊत (२०, कामशेत) यांचा मृत्यू झाला.

तर दीक्षित दयानंद पुजारी (२०) आणि मयूर हनुमंत शिंदे (२०), दोघेही कामशेत परिसरातील रहिवासी, जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र, सारोळा येथील अधिकारी व अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

या घटनेचा पुढील तपास व कायदेशीर कार्यवाही शिरवळ पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button