उरण दि १७(विठ्ठल ममताबादे ) देशाचे प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उरण मानव सेवा संघाच्या वतीने आदिवासी बांधवांसाठी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी रा. जि. प. शाळा, डाऊरनगर, उरण येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
उरण मानव सेवा संघ ही संस्था उरण परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवत असून, शिक्षण, आरोग्य तसेच गरजू नागरिकांना मदत करण्याचे कार्य करत आहे. समाजात वावरताना गरजू बांधवांना आवश्यक ती मदत मिळावी, या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
उरण परिसरातील नागरिकांच्या विविध सामाजिक गरजा लक्षात घेऊन भविष्यातही संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
Back to top button
