महाराष्ट्र
परभणी–मानवत महामार्गावर इनोव्हा पुलाखाली कोसळली; ५ ते ६ जण जखमी पहाटे पाचच्या सुमारास अपघात…….
भारतीय संघर्ष......


परभणी( प्रतिनिधी): परभणी ते मानवत दरम्यानच्या महामार्गावर बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास पुन्हा एकदा अपघात झाला. एमएच १२ डीवाय ०१०५ क्रमांकाची इनोव्हा कार पुलाखाली कोसळल्याने या अपघातात पाच ते सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या महामार्गावरील पुलाचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, काम सुरू असलेल्या पुलाजवळ आवश्यक दिशादर्शक फलक किंवा वाहनचालकांना सावध करणारी पुरेशी सूचना नसल्याने वाहनधारकांना पुलाचा अंदाज येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने पुलात पडण्याच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे.





