महाराष्ट्र
वीर वाजेकर महाविद्यालयातर्फे नागाव पिरवाडी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम संपन्न.
भारतीय संघर्ष........

उरण दि २७(विठ्ठल ममताबादे ) रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, फुंडे आणि सागरी विकास मंच, राऊंड फॉरेस्ट कांदळवन, उरण वन विभाग, लायन्स क्लब वीर वाजेकर कॅम्पस, यांच्या संयुक्त विद्यमाने उरण येथील नागाव पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली. पर्यावरण संवर्धन, सागरी जैवविविधतेचे संरक्षण आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत सुमारे ५०० विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदविला.

वीर वाजेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र दल (NCC), यांच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम पार पडला. वीर वाजेकर महाविद्यालयासोबतच यू. इ. एस. कॉलेज, केडीएस कॉलेज, उरण तसेच काळसेकर कॉलेज, पनवेल येथील विद्यार्थ्यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी आपल्या मनोगतात समुद्रकिनारा हा केवळ पर्यटनाचे ठिकाण नसून पर्यावरणीय समतोल, सागरी जैवविविधता आणि भविष्यातील अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. “आपला सागरकिनारा, आपली जबाबदारी” या भावनेतून सातत्याने स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.




