महाराष्ट्र

राष्ट्रीय सेवा योजना ही व्यक्तिमत्त्व विकासाची जीवनशाळा- डॉ. रामहरी काकडे ============== महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा

भारतीय संघर्ष न्यूज नेटवर्क महाराष्ट्र

विष्णू राठोड,

गेवराई, दि. २४ (प्रतिनिधी) राष्ट्रीय सेवा योजना विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, शिस्त, संघभावना, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव विकसित होतो. त्यामुळे रासेयो ही केवळ समाजसेवेची योजना नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची जीवनशाळा आहे. असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक डॉ. रामहरी काकडे यांनी केले. ते महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस समारंभ प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महिला महाविद्यालय, गेवराई येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. तात्याराम सोंडगे होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. रामहरी काकडे यांनी राष्ट्रीय सेवा योजना च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच समाज आणि राष्ट्र विकासासाठी होणाऱ्या योगदानावर प्रकाश टाकला. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य जनजागृती, ग्रामविकास, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक जनजागृती यांसारख्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रो. तात्याराम सोंडगे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना निर्माण होत असल्याचे सांगितले. शिक्षणाबरोबरच समाजसेवेचा अनुभव विद्यार्थ्यांच्या जीवनाला व्यापक दिशा देतो. तसेच आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करून सामाजिक हितासाठी त्याचा उपयोग करावा, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रो. शिवाजी दिवाण यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना दिवसाचे महत्त्व तसेच वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रम अधिकारी प्रो. संगिता आहेर यांनी ही विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. गोकुळदास कदम यांनी केले, तर आभार प्रा. शिला कवडे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button