महाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्ग ५२ म्हणजे मृत्यूचा सापळा , सुघोष मुंढे

भारतीय संघर्ष न्यूज....

गेवराई/विष्णु राठोड,

राष्ट्रीय महामार्ग ५२ मध्ये आजपर्यंत दोदडगाव फाटा येथे 14 लोकांचा मृत्यू झालेला आहे व ७ लोकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे तरी इथे नवीन सर्विस रोड व्हावा व वळण रस्ता मिळावा तसेच मृत्युमुखी पडलेल्या लोकांना व कायम अपंगत्व आलेल्या लोकांनी भरीव नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी दोदडगाव फाटा व पंचक्रोशीतील पाच गावातील लोकांनी आज उत्स्फूर्त रस्ता रोको दोदडगाव फाटा, मंगलस्तंभ याठिकाणी करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती डॉक्टर नारायणराव मुंढे, सत्संग मुंढे,सरपंच बंडू मुंढे,सरपंच रवींद्र चेपटे, रामजी खुरंगे, उपसरपंच भालेराव, श्री .हातागळे, भीमा नवगिरे, कल्याण काका मुंडे, दिलीप भाऊ मुंढे, पोपटराव मुंढे, मिठू बापू मुंढे,
यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर नारायणराव मुंढे यांनी हा महामार्ग लोकांच्या प्रगतीसाठी आहे की अधोगतीसाठी आहे चुकीचा रस्ता करणे हा षड्यंत्राचा तर भाग नाही ना? त्यामुळे यास जबाबदार असणारे वरिष्ठ अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी यावेळी केली, यावेळी समायोजित भाषण श्री सत्संग मुंढे यांनी केले सरपंच रवींद्र चपटे ,राजेंद्र मुंडे,बंडू बापू मुंडे यांची झाली तर सूत्रसंचालन प्रा.लहुजी दारगुडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button