महाराष्ट्र
बनावट व चुकीची २ आज्ञापत्रे रद्द करा; विस्थापितांना न्याय द्या, पूर्ण पुनर्वसन करा!” विस्थापितांची मागणी. हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन.
भारतीय संघर्ष न्यूज....

उरण शहर प्रतिनिधी,
उरण, दि. १० (विठ्ठल ममताबादे) :
उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा(शेवा कोळीवाडा )व नवीन शेवे या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित असल्याने ग्रामस्थांचा संताप आता उफाळून आला आहे. जेएनपीए प्रकल्पासाठी स्थानिकांनी जमीन, घरे देऊन आणि पारंपरिक उपजीविकेवर परिणाम सहन करूनही पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप पूर्णत्वास न गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आता “आश्वासन नको, निर्णायक निर्णय हवा!” अशी आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांनी आंदोलनाची घोषणा केली आहे.
नवीन शेवा व शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) ग्रामस्थांच्या वतीने रविवार दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजता श्री शांतेश्वरी मंदिर नवीन शेवा येथे महत्वाची बैठक संपन्न झाली.या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी रोजी जेएनपीए प्रशासन भवन समोर उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठक प्रसंगी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, पंचायत समिती सदस्य दिपक भोईर, सरपंच सोनल घरत,नवीन शेवा ग्रामसुधारणा मंडळचे अध्यक्ष कमळाकर पाटील,उपाध्यक्ष लक्ष्मण म्हात्रे, भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत,तंटामुक्ती समिती अध्यक्ष कृष्णा घरत,सल्लागार बाळकृष्ण पाटील,शाखाप्रमुख शैलेश भोईर,सल्लागार पंडित घरत, काँग्रेसचे जेष्ठ नेते कमळाकर घरत,शिवसेनेचे गणेश म्हात्रे,ग्रामसुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडा अध्यक्ष सुरेश कोळी,खजिनदार नितीन कोळी,माजी सरपंच परमानंद कोळी, सामाजिक कार्यकर्ते हरेश कोळी,नवीन शेवा ग्रामसुधारणा मंडळाचे सल्लागार हेमंत म्हात्रे, एकनाथ घरत, नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा गावचे प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर महत्वाच्या बैठकीत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर,नवीन शेवा ग्रामपंचायत सरपंच सोनल घरत, नवीन शेवा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमळाकर पाटील,भाजपचे चंद्रकांत घरत, सल्लागार पंडीत घरत,शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा )ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी, माजी सरपंच परमानंद कोळी आदी पदाधिकारी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.




