उरण शहर,
उरण दि ११(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेचे पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल, पिरकोन च्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शैक्षणिक यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
इयत्ता ४ थी मधील कु. अवनी विकास गावंड हिने १९४ गुण, इयत्ता ५ वी मधील कु. आर्य निलेश म्हात्रे याने १७४ गुण, तर इयत्ता ७ वी मधील कु. विधेश सदाशिव जोशी याने २३४ गुण मिळवून शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून रायगड जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान मिळवला आहे . त्यांच्या या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, नियमित अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन यांचा मोलाचा वाटा आहे.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्था रायगड विभाग समन्वय समितीचे सदस्य आणि रा. जि. प. सदस्य जीवन गावंड,स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन रमाकांत गावंड,व्हाईस चेअरमन अनंतदादा गावंड,स्कूल कमिटीचे सदस्य अनंत ना. गावंड,रमाकांत जोशी, विलास गावंड,मुकूंद गावंड,राजेंद्र गावंड, सुरेंद्र गावंड,लक्ष्मण गावंड, हिराचंद पाटील,चंद्रकांत पाटील, प्रा. प्रमोद म्हात्रे,मनोहर गावंड, मंगेश गावंड,नरेंद्र गावंड,विलास गावंड, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निकीता गायकवाड, शिक्षकवृंद आणि पालकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
Back to top button
