उरण दि ४(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील धुतुम गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

धुतुम खालची आळी यांच्या वतीने शंकर मंदिरात पूजा अर्चा,अभिषेकचा मान सामाजिक कार्यकर्ते समाधान कृष्णा कटेकर व सामाजिक कार्यकर्त्या भारती समाधान कटेकर या दांपत्याला देण्यात आला. त्यांच्या शुभहस्ते सप्ताहाचा अभिषेक, पूजा अर्चा भक्तिभावाने संपन्न झाला. यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा तसेच गावात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, यासाठी श्रीकृष्ण चरणी प्रार्थना करण्यात आली.जन्माष्टमीच्या निमित्ताने रात्रभर नामस्मरण, भजन आणि जागर करण्यात आला. सालाबादप्रमाणे दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत रघुनाथ ठाकूर यांच्या घरात आयोजित करण्यात आला.यंदाही धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकोपा जपत हा उत्सव उत्साहात पार पडला.

या धार्मिक सोहळ्यास दशरथ रोहिदास ठाकूर, मेघनाथ दशरथ ठाकूर, सुरेश गंगाराम ठाकूर, गोविंद नामदेव ठाकूर, यांच्यासह धुतुम खालची आळीतील ग्रामस्थ,धुतुम गावातील ग्रामस्थ,भाविक आणि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी माजी जि. प. सदस्य वैजनाथ ठाकूर, माजी जि. प. सदस्य कुंदा ठाकूर यांनी श्रीकांत ठाकूर यांच्या घरी जाऊन श्री कृष्णच्या मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतले.भजन, नामस्मरण आणि भक्तिमय वातावरणामुळे धुतुम गावात संपूर्ण रात्र श्रीकृष्णमय झाली. अखेर सर्व उपस्थितांना श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकालाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
Back to top button
