गेवराई! विष्णु राठोड दि. २५ मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई, जि. बीड येथे राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त दि. २४ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे आजीवन अध्ययन व विस्तार सेवा केंद्राचे संचालक प्रा. अश्विन रांजणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या विज्ञान शाखेचे माजी अधिष्ठाता प्राचार्य मजहर फारुकी, प्राचार्य डॉ. रजनी शिखरे, उपप्राचार्य मेजर विजय सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. बालाजी रुपनर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य नवनाथ गोरे, पर्यवेक्षक आशीष वाघुंबरे, विद्यार्थी विकास विभागाचे बीड जिल्हा समन्वयक डॉ. समाधान इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रक्तदान शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय, बीड येथील डॉ. प्रतिकेश घुमरे (वैद्यकीय अधिकारी), नितीन सोळंके (टेक्निशियन), संतोष गायकवाड (स्टाफ नर्स) आणि ज्ञानेश्वर कुमकर (अटेंडंट) यांनी सहकार्य केले.
महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदानासारख्या उपक्रमातून गरजू रुग्णांना मदत मिळण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते, असा संदेश यावेळी देण्यात आला.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. देवीदास रिठे, डॉ. प्रदीप दहिंडे आणि डॉ. मीना नागवंशी यांनी विशेष प्रयत्न केले. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले. ३१ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.
Back to top button
