येवता प्रतिनिधी:दि.३० रोजी केज तालुक्यातील तुकुचीवाडी येथे खंडोबा देवस्थानाचे मंदिरांची भूमिपूजन या भागाचे लोकप्रिय माजी जिल्हा परिषद सदस्य विजयकांत(भैया) मुंडे यांच्या शुभहस्ते व ह.भ.प.श्री. अर्जुन महाराज लाड(गुरुजी) यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांन समवयत करण्यात आले गावकऱ्यांनी लोकसहभागातून खंडोबा देवस्थान मंदिर उभारण्याचा पुढाकार घेतला असून तो तुकूची वाडी गावात भव्य दिव्य असे मंदिर होणार असल्याने गावाच्या वैभवात भर पडनार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाल्याचे दिसून आले.