महाराष्ट्र

अनुसूचित जातीतील आरक्षणाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी २९ तारखेला आझाद मैदानावर उपस्थित राहा: दादाराव रोकडे 

भारतीय संघर्ष न्यूज नेटवर्क महाराष्ट्र

गेवराई! विष्णु राठोड,

अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ समाजातील सर्वात शेवटच्या आणि वंचित घटकापर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचवायचा असेल तर सर्वांनी संघटित होण्याची गरज आहे. हा हक्क मिळवण्यासाठी आगामी २९ तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या निर्धार महामोर्चाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे बीड जिल्हा अध्यक्ष दादाराव रोकडे यांनी केले आहे.रोकड़े यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की आरक्षणाच्या मूळ उद्देशाचा लाभ अजूनही समाजातील अनेक वंचित आणि दुर्लक्षित उपजातींपर्यंत पोहोचलेला नाही. हा अन्याय दूर करण्यासाठी आणि शेवटच्या घटकाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी हा लढा अत्यंत महत्त्वाचा आहे.२९ तारखेला होणारे हे आंदोलन कायदेशीर आणि घटनात्मक हक्कांसाठी असून संपूर्ण राज्यातून समाजबांधव यात सहभागी होणार आहेत. मुंबई आणि परिसरातील तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेने आपल्या हक्कांच्या जनजागृतीसाठी आणि आरक्षणाच्या न्याय्य वाटपासाठी आझाद मैदानावर सकाळी ठीक ११ वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष दादाराव रोकडे यांनी यावेळी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button