महाराष्ट्र

सब ज्युनिअर आट्या पाट्या जिल्हा स्पर्धेत मुली व मुलांमध्ये जी. एम. जाधव विद्यालय आसनगाव प्रथम…

भारतीय संघर्ष न्यूज....

कल्याण प्रतिनिधी,

श्री.प्रवीण खाडे सर,

कल्याण: ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशन च्या माध्यमातून ६ सप्टेंबर रोजी नानासाहेब फडके क्रीडा संकुल कल्याण येथे झालेल्या स्पर्धेत जी. एम. जाधव विद्यालय आसनगाव च्या मुली व मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला तर मुलींमध्ये द्वितीय क्रमांक लोकमान्य गुरुकुल, डोंबिवली, तृतीय क्रमांक शिवाई विद्यालय इंग्लिश मिडीयम स्कूल, ठाणे आणि मुलांमध्ये द्वितीय क्रमांक भारतीय सैनिकी विद्यालय, खडवली, तृतीय क्रमांक सिद्धार्थ विद्यामंदिर माध्यमिक, कल्याण यांनी पटकावला.


सब ज्युनिअर आट्या पाट्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य आर. डी. पाटील, महात्मा गांधी विद्यामंदिर, डोंबिवली शाळेचे मुख्याध्यापक सुनील कांबळी हे मान्यवर उपस्थित होते. तसेच आट्या पाट्या असोसिएशनचे पदाधिकारी उदय नाईक, लक्ष्मण इंगळे, राजेंद्र शेटे, प्रवीण खाडे, अविनाश नलावडे, सुभाष गायकवाड, आशा परब, अंकुर आहेर यांनी विशेष उपस्थिती दिली. या स्पर्धेत कल्याण, डोंबिवली, शहापूर, ठाणे शहर येथील शाळा व क्रीडा मंडळांनी मोठा सहभाग नोंदवला. पंच मंडळ अध्यक्ष मिलिंद धंबा यांच्या नेतृत्वाखाली सर्व पंचांनी उत्कृष्ट काम केले. निवड समितीवर आट्या पाट्या आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुराधा मोरे, वैभवी चव्हाण यांनी २५ मुली व २५ मुलांची निवड केली. निवड झालेल्या खेळाडूंचे शिबिर घेण्यात येणार असून त्यात राज्य स्पर्धेसाठी १५ मुली व मुलांचा अंतिम संघ निवडला जाणार आहे, असे सहसचिव एजाज तडवी यांनी सांगितले. या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button