महाराष्ट्र
तलावात अतिक्रमण,भिंत पोखरून जलाशयाला साठ्याला धोका,प्रशासनाचे दुर्लक्ष
भारतीय संघर्ष न्यूज नेटवर्क महाराष्ट्र.....


पोलिस प्रशासनाने ही गटविकास अधिकारी यांना याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करून कळवले परंतु याकडे अद्याप पर्यंत भविष्याच्या दृष्टिकोनातून लक्ष देण्यात आलेले नाही ही शोकांतिका आहे.या तलावाच्या पश्चिमेस अनेकांनी अतिक्रमण करून शेत जमीन काढली असून याठिकाणी ऊस,कापूस पिके घेऊन यांना तलावातून विद्युत मोटारीद्वारे पाणी देण्यात येते ही बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनास सांगितली परंतु अधिकारी यांनी कानाडोळा केला असून वेळ मारून नेली आहे.या तलावाच्या संरक्षणासाठी जी भिंत उभी आहे ती सुरक्षित असावी ही अपेक्षा आहे परंतु याकडे कोणाचे लक्ष नसल्याने याठिकाणहून मुरूम,माती विनापरवाना नेण्याचे काम होते.असाच प्रकार सोमवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष शेख खिजर यांच्या निदर्शनास आला यावेळी त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी साहेब बीड,पोलिस अधीक्षक साहेब बीड,तलवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलंगेकर यांना भ्रमणध्वनी द्वारे कळवण्यासाठी पर्यत्न केले परंतु त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी गोपनीय शाखेचे विठ्ठल राठोड यांना संपर्क केला परंतु त्यांनी मी जेवण करत आहे मला वीस ते पंचवीस मिनिट लागतील असे सांगितले.यादरम्यान याठिकाणी अवैध मुरूम उपसा करणारी जेसीबी आणि हायवा निघून गेले. या घटनेमुळे तलवाडा गावात अवैध धंद्यांना बळकटी मिळते का ? अवैध धंद्यावाले कायदा आणि सुव्यवस्था पायदळी दुडवतात का ? यांना कोणाची भीती नाही का ? पोलिस प्रशासनाचा धाक संपला का ? महसूल चे अधिकारी मॅनेज आहेत का ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून या घटनेने तलावाच्या संरक्षण भिंतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून याठिकाणहून मुरूम,माती चोरून नेणाऱ्या जेसीबी,आणि हायवा यावर तपासणी करून कार्यवाही करण्यात यावी यासाठी मंडळ अधिकारी यांनी तलाठी,ग्रामस्थ, आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आणि सक्षम पंचनामा केला आहे.आता यावर काय कार्यवाही होते याकडे तलवाडा गावकरी आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.