महाराष्ट्र

पोईतांडा ग्रुप ग्रामपंचायत भवन व अंगणवाडीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे ? बांधकामाची रीतसर चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करावी – पत्रकार विष्णु राठोड

भारतीय संघर्ष न्यूज.....

 

विष्णु राठोड-गेवराई,

गेवराई तालुक्यातील पोईतांडा याठिकाणी सुरू असलेल्या ग्रामपंचायत भवन आणि अंगणवाडीचे बांधकाम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असून,या कामाचे बेसमेट भराव हा मुरुमाने भरण्या ऐवजी ठिसूर दगडाने भरला असून वेगवेगळे काम असताना दोन्ही कामासाठी एक कॉलम वापरत असल्याचे दिसून येत असल्याने यामध्ये शासनाच्या निधीचा अपहार होत आहे.त्यामुळे सदरील कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून यावर योग्य कार्यवाही करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे गटविकास अधिकारी पंचायत समिती गेवराई याच्या मार्फत पत्रकार विष्णु राठोड यांनी पाच ऑक्टोबर रोजी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत सविस्तर असे की,
मौजे पोईतांडा, ता. गेवराई, जि. बीड येथे नवीन ग्रुप ग्रामपंचायत भवन व नवीन अंगणवाडी मंजूर आहे. दोन्ही इमारती स्वतंत्र असताना ठेकेदाराने एका बाजूच्या एकाच आर सी सी भीमचा
वापर दोन्ही इमारतीसाठी केला आहे त्यामुळे भविष्यात इमारतीला धोका निर्माण होईल, सदरील कामत स्वतंत्र भीम बांधणे बंधनकारक असताना
असे केल्यामुळे 1. इमारतीच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊन भविष्यात हानी होऊ शकते2. दोन भीमचे बिल काढून एकाच भीमचे काम करून शासनाच्या निधीचा अपहार झाला आहे असे निदर्शनास येते.3. या कामांसाठी देखरेख करत असलेले अभियंता यांनी मोजमाप पुस्तिका तयार करू नये.तरी आपण प्रत्यक्ष जागेवर येऊन मोजमाप करून, दोषी ठेकेदार व अभियंता
यांच्यावर कारवाई करून दोन्ही इमारतीचे स्वतंत्र भीम बांधून घ्यावेत अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, कार्यकारी अभियंता,
बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, बीड,गटविकास अधिकारी पंचायत समिती गेवराई यांच्याकडे पत्रकार विष्णु राठोड यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button