महाराष्ट्र
राज्याप्रमाणे ३३ जातींना केंद्रात ओबीसी आरक्षण मिळावे. – श्रावण फरकाडे
भारतीय संघर्ष न्यूज........

उरण दि ४(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र राज्यात ३३ जातींना ओबीसी आरक्षण आहे मात्र त्याच ३३ जातींना केंद्रात आरक्षण नाही त्यामुळे केंद्रात समावेश न झालेल्या या ३३ जातींचे खूप मोठे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक नुकसान होत आहे. गेली अनेक वर्षे ओबीसी महाराष्ट्र कृती समितीच्या माध्यमातून ३३ जातींना महाराष्ट्र राज्याप्रमाणे केंद्र सरकारनेही ओबीसी आरक्षण द्यावे यासाठी कायदेशीर व शांततेच्या मार्गाने लढा सुरु आहे. शासन दरबारी पत्रव्यवहार सुरु आहेत. विविध सर्वच पक्षाचे मंत्री, खासदार आमदार यांच्याही गाठी भेटी घेतल्या. मात्र गेली अनेक वर्षे हा प्रश्न सुटत नसल्याने आता निर्णायक भूमिके पर्यत हा लढा पोहोचला असून जर ओबीसी महाराष्ट्र कृती समितीने केलेल्या मागण्या मान्य झाली नाही तर आगामी होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुका लक्षात घेता तीव्र आंदोलन करण्यात येईल. होणाऱ्या परिणामास शासन पूर्णपणे जबाबदार राहील असा आक्रमक इशारा ओबीसी महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष श्रावण फरकाडे यांनी उरण येथे दिला.
महाराष्ट्रातील ३३ ओबीसी जाती/समाज समूहांचा केंद्र सरकारच्या केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची कार्यकारणी बैठक रविवार, दि.४ ऑक्टोबर २०२६ रोजी आनंदी हॉटेल, कोटनाका-उरण, जिल्हा रायगड येथे कराडी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.यावेळी अध्यक्ष श्रावण फरकाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गरज पडल्यास न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यासाठी सर्व ३३ जातीनी एकत्र यावे. एकत्र लढा उभारावा असे आवाहन त्यांनी समाजाला केले.यावेळी व्यासपीठावर अंबाला लोकसभा (हरियाणा )चे खासदार अमन कुमार नागरा, भाजपा कार्यकर्त्या नवी दिल्ली – श्रीमती पुष्पाजी नागरा, ओबीसी महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष श्रावण फरकाडे, कार्याध्यक्ष – राम खरपूरिया लोधी, सचिव दिपक नेवे,संरक्षक -नामदेव राऊत, माजी प्राचार्य पी आर बडगुजर, लेवे गुजर समाजाचे जी एम पाटील,प्रा. शालिक नेवारे, ऍड मदन गोवारी आदी मान्यवर उपस्थित होते.




