महाराष्ट्र

गेवराईत भव्य शोभायात्रेने होणार रामकथा आणि किर्तन महोत्सवाचा शुभारंभ माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांच्या ८९ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

भारतीय संघर्ष

गेवराई-विष्णु राठोड
दि.२२ माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८९ व्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने शनिवार, दि.३ ऑक्टोबर रोजी गेवराई शहरात सकाळी १० वाजता भव्य शोभायात्रेने श्रीराम कथा ज्ञानयज्ञ व भव्य किर्तन महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. ह.भ.प. रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर हे शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. दररोज ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण, श्रीराम कथा, भजन संध्या आणि महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकारांचे किर्तन असे भरगच्च कार्यक्रम दि.३ ते १० ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. भाविक भक्तांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

गेवराई विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त शिवनगरी, र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे शनिवार, दि.३ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान श्रीराम कथा ज्ञानयज्ञ व भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादाप्रमाणे याहीवर्षी शिवाजीराव (दादा) पंडित यांच्यावर प्रेम करणाऱ्या सहकाऱ्यांच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि.३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भव्य शोभायात्रेने महोत्सवाचा शुभारंभ होणार असून शनिवार, दि.१० ऑक्टोबर रोजी महाप्रसादाने सांगता होणार आहे. दररोज सकाळी ७ ते १० या वेळेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी २ ते ५ या वेळेत श्रीराम कथा, सायंकाळी ६ ते ८ या वेळेत भजन संध्या आणि रात्रौ ८ ते १० या वेळेत किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार यानिमित्ताने गेवराईत हजेरी लावणार आहेत. तर विदर्भरत्न ह.भ.प. रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीराम कथा ऐकण्याचा योग गेवराईकरांना येणार आहे. कार्यक्रमाची पूर्वतयारी अभिष्टचिंतन सोहळा समितीचे पदाधिकारी करत आहेत. भाविक भक्तांनी श्रीराम कथा ज्ञानयज्ञ व किर्तन महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने करण्यात आले आहे. ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व ह.भ.प. नामदेव महाराज शेकटेकर व ह.भ.प. राम महाराज अंबुले करणार आहेत.

शनिवार, दि.३ ऑक्टोबर रोजी संगीत अलंकार ह.भ.प. गणेश महाराज जरांगे यांचा अभंगवाणी कार्यक्रम तर ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, बुलढाणा यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. रविवार, दि.४ ऑक्टोबर रोजी भजन सम्राट डॉ.तुळशीराम आतकरे गुरुजी यांचे संगीत भजन तर ह.भ.प. युवकवीर ज्ञानेश्वर महाराज पठाडे, कर्जत यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. सोमवार, दि.५ ऑक्टोबर रोजी भारुड सम्राट ह.भ.प. विष्णू महाराज बांडे यांचे सोंगी भारुड आणि ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत, श्री मंगलगड, डोंबीवली यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. मंगळवार, दि.६ ऑक्टोबर रोजी भजन सम्राट आदिनाथ सटले गुरुजी यांचे संगीत भजन आणि ह.भ.प. श्रीगुरु जयवंत महाराज बोधले, श्री क्षेत्र पंढरपूर यांचे किर्तन होणार आहे. बुधवार, दि.७ ऑक्टोबर रोजी पद्मश्री राशिद खाँ यांचे शिष्य पंडित कृष्णाजी बोंगाणे यांचा अभंगवाणी कार्यक्रम आणि सुप्रसिध्द समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे किर्तन होणार आहे. गुरुवार, दि.८ ऑक्टोबर रोजी संगीत अलंकार सदानंद मगर व वैष्णवी मगर यांचे संगीत भजन आणि ह.भ.प. अधिवक्ता कृष्ण महाराज चवरे, श्री क्षेत्र पंढरपूर यांचे किर्तन होणार आहे. शुक्रवार, दि.९ ऑक्टोबर रोजी संगीत अलंकार उध्दव महाराज शिंदे यांचे संगीत भजन आणि संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज ह.भ.प. श्रीगुरु पुंडलिक महाराज देहूकर यांचे किर्तन होणार आहे. शनिवार, दि.१० ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत ह.भ.प. प्रेममूर्ती महंत शिवाजी महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. यावेळी सर्व धर्मीय संत-महंत यांच्या उपस्थितीत माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे.

माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८९ व्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या श्रीराम कथा ज्ञानयज्ञ, भजन संध्या व किर्तन महोत्सवाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button