महाराष्ट्र

समाधान म्हात्रे यांना ‘आयकॉनिक लिडर ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार. सामाजिक, उद्योजकीय कार्याची दखल; मान्यवरांच्या हस्ते सन्मान.

भारतीय संघर्ष.....

 

उरण दि. २९ (विठ्ठल ममताबादे) ग्रीन वर्ल्ड आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात साई भवानी एंटरप्रायझेसचे संचालक तथा उरण तालुक्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते समाधान म्हात्रे यांना ‘आयकॉनिक लिडर ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.


पुणे येथील ॲड. शार्दूलराव सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल २, नऱ्हे पुणे येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. समाधान म्हात्रे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला ज्ञानेश्वर खिलारे (IAS) अतिरिक्त आयुक्त जमा बंदी आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), उदय बोरावके कृषी उद्योजक तसेच कृषी व कृषी संलग्न अभ्यासाचे प्रसारक आणि डॉ. पराग काळकर प्र. कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच ॲड. शैलेंद्र जाधवर, उपाध्यक्ष – जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि लेखक गौतम कोतवाल, अध्यक्ष – लीड जीडब्ल्यू फाउंडेशन तथा संचालक – राजगुरुनगर सहकारी बँक लि.तसेच महिला सामाजिक कार्यकर्त्या मीनाताई जगदाने यांचीही उपस्थिती होती.
समाधान म्हात्रे यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान झाला असून, विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button