उरण दि. २७ (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील नागाव गोसपाडा (पिंपळआळी) येथील श्री बाबदेव मित्रमंडळाच्या समाजमंदिराची अवस्था अत्यंत धोकादायक झाली होती. समाजमंदिरातील पिलर जीर्ण झाल्याने दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक साखर चौथीच्या गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असताना मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात येताच समाजमंदिराच्या दुरुस्तीसाठी तातडीने पुढाकार घेण्यात आला.ही बाब मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वैभव कडू यांना सांगितली. तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नागाव-म्हातवली प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष तसेच आई मांगीनदेवी पारंपरिक मच्छीमार सोसायटी नागावचे चेअरमन, सामाजिक कार्यकर्ते वैभव यशवंत कडू यांच्याशी संपर्क साधला.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते वैभव कडू यांनी मंडळाची विनंती तात्काळ मान्य केली आणि समाजमंदिराच्या दुरुस्तीचे बांधकाम हाती घेतले.

दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करण्यात आल्याने समाजमंदिर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका टळल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.
“सामाजिक बांधिलकीतून केलेली मदत हीच खरी सेवा” या भावनेतून वैभव कडू यांनी सहकार्य केल्याबद्दल श्री बाबदेव मित्रमंडळ, नागाव गोसपाडा (पिंपळआळी) यांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
समाजमंदिराच्या दुरुस्तीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागला असून, सामाजिक कार्यातून नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
Back to top button
