महाराष्ट्र

बंजारा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहा – योगेश पवार यांचे आवाहन

भारतीय संघर्ष..…....

गेवराई ! विष्णु राठोड
: बंजारा ब्रिगेडच्या वतीने धारूर तालुक्यातील जगदंबा गड येथे सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य बंजारा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला महाराष्ट्रातील बंजारा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन बंजारा ब्रिगेडचे बीड जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ पवार यांनी केले आहे.
बंजारा समाजाची एकजूट अधिक मजबूत करणे, समाजातील बंधुभाव वाढविणे आणि समाजाच्या विविध प्रश्नांवर विचारमंथन करणे, या दृष्टीने या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याला महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजबांधव, महिला भगिनी, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बंजारा बीग्रेड जिल्हाध्यक्ष योगेश पवार यांनी केले आहे.
मेळाव्याचा तपशील :
कार्यक्रम : बंजारा जनजागृती मेळावा
दिनांक : सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६
वेळ : सायंकाळी ५ वाजता
स्थळ : जगदंबा गड, आडई तांडा, तालुका धारूर, जिल्हा बीड
“एक बंजारा, लाख बंजारा! समाजाच्या एकजुटीसाठी चला, जगदंबा गडावर!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button