गेवराई! विष्णु राठोड,
दि. २२, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘क्रोनोलॉजी ऑफ अकाउंटन्सी’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

विविध विद्याशाखांमधून वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अकाउंटन्सी हा विषय काहीसा अवघड व आव्हानात्मक वाटतो. विद्यार्थ्यांच्या मनातील अकाउंटन्सी विषयाची भीती दूर करून विषय समजून घेण्यासाठी आवश्यक मूलभूत संकल्पना सोप्या पद्धतीने स्पष्ट करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
वाणिज्य विभागातील प्रा. भारत पगारे यांनी या विषयावर मार्गदर्शन करताना अकाउंटन्सी विषयाचा क्रम, मूलभूत संकल्पना आणि त्याचा अभ्यास करण्याची पद्धत विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. विद्यार्थ्यांनीही कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यशाळेचे समन्वयक प्रा. संदीप वंजारी यांनी कार्यशाळेचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी अकाउंटन्सी विषयाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत अशा उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोठा उपयोग होत असल्याचे सांगितले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. मुक्ताराम शिंदे, प्रा. श्रीकिसन लोणकर, प्रा. येवले व प्रा. खरात यांनी विशेष प्रयत्न केले.व व्यवस्थापन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘क्रोनोलॉजी ऑफ अकाउंटन्सी’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
विविध विद्याशाखांमधून वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अकाउंटन्सी हा विषय काहीसा अवघड व आव्हानात्मक वाटतो. विद्यार्थ्यांच्या मनातील अकाउंटन्सी विषयाची भीती दूर करून विषय समजून घेण्यासाठी आवश्यक मूलभूत संकल्पना सोप्या पद्धतीने स्पष्ट करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
वाणिज्य विभागातील प्रा. भारत पगारे यांनी या विषयावर मार्गदर्शन करताना अकाउंटन्सी विषयाचा क्रम, मूलभूत संकल्पना आणि त्याचा अभ्यास करण्याची पद्धत विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. विद्यार्थ्यांनीही कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यशाळेचे समन्वयक प्रा. संदीप वंजारी यांनी कार्यशाळेचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी अकाउंटन्सी विषयाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत अशा उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोठा उपयोग होत असल्याचे सांगितले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. मुक्ताराम शिंदे, प्रा. श्रीकिसन लोणकर, प्रा. येवले व प्रा. खरात यांनी विशेष प्रयत्न केले.
Back to top button
