महाराष्ट्र

महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ

भारतीय संघर्ष न्यूज नेटवर्क महाराष्ट्र......

 

उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )कामगार नेते महेंद्रशेठ यांचे हसणे आणि रुसणे, या संमिश्र भावना आहेत; परंतु महेंद्रशेठ घरत मनाचा सच्चा माणूस आहे आणि हवेहवेसे वाटणारे नेतृत्व आहे. विनोद म्हात्रे यांच्या वाढदिवसाला महेंद्रशेठ घरत यांच्या उपस्थितीने चार चॉंद लागले आहेत. महेंद्रशेठ यांच्यासारख्या आश्वासक चेहऱ्याला योग्य संधी दिली जाईल. ती माझी नैतिक जबाबदारी आहे,” असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शेलघर येथे मंगळवारी (ता. ८) व्यक्त केले. उरण तालुका काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, “महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात काँग्रेसला उभारी मिळाली. जिल्ह्यात वर्षानुवर्षे सत्तेत असणाऱ्या शेकापला यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत शून्यावर यावे लागले, मात्र काँग्रेसने घवघवीत यश मिळविले. यामागे महेंद्रशेठ घरत यांची रननीती कामाला आली. बऱ्याच प्रतीक्षेनंतर महेंद्रशेठ घरत यांची भेट होणे, हा दुग्धशर्करा योग आहे. महेंद्रशेठ जगभर फिरतात आणि आम्हाला ते देश जगाच्या नकाशात शोधावे लागतात. त्यांचा अनुभव दांडगा आहे, त्याचा फायदा काँग्रेसला निश्चितच होईल. खोटं बोला, पण रेटून बोला, हीच भाजपची मनोवृत्ती आहे. मोदी उठसूठ खोटे बोलत आहेत, जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसची पाळेमुळे तळागाळात अधिक घट्ट रोवण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे.”
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले, ” कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हे माझे कर्तव्य आहे. दुसऱ्याला संधी देण्यासाठी दोन पावले मागे येण्याची विनोद म्हात्रे यांची भूमिका महत्त्वाची आहे.”
यावेळी तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे म्हणाले, महेंद्रशेठ घरत यांच्याकडून आम्हा कार्यकर्त्यांना खूप काही शिकण्यासारखे आहे. आमच्या मागे ते नेहमीच खंबीरपणे उभे आहेत. समाजाशी बांधिलकी ठेवून तळागाळातील कार्यकर्त्याला साथ देण्यात महेंद्रशेठ घरत यांचा हातखंडा आहे. त्यांचा करिष्मा उरण नगरपालिका निवडणुकीतही पाहायला मिळाला. यावेळी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे महेंद्रशेठ घरत यांनी ‘सुखकर्ता’वर स्वागत केले. तसेच तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांचा सपत्नीक प्रांताध्यक्षांच्या हस्ते पुष्पहार हार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button