भारतीय संघर्ष न्यूज,
केज/येवता:प्रतिनिधी:दि.२५.केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथील ग्रामपंचायत अधिकारी महिंद्र मुंडे यांनी शासन परिपत्रक अधिन राहून स्व.अजितदादा पवार यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय,जीवाचीवाडी येथे साजरी केली आहे परंतु ग्रामपंचायत सदस्य शिवाजी लक्ष्मण चौरे यांनी स्व.अजितदादा पवार यांची जयंती ग्रामपंचाय कार्यालय,जीवाची वाडी येथे केलीनसलेची तक्रार विना स्वाक्षरी विना दिनांक निवेदन मा.जिल्हाधिकारी साहेब,बीड यांना तक्रार केलेली आहे प्रत्यक्षात वास्तव्य पाहता ग्रामपंचाय अधिकारी,महिंद्र मुंडे यांच्याकडे ग्रामपंचायतचे तीन पद्धभार असल्याने त्यांनी तिन्ही पैकी एकामुख्यालयीन ग्रामपंचायत कार्यालयात लिंबाची वाडी ता.केज येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून जयंती साजरी केल्याचे पुरावेसह दिसून आले.ग्रामपंचायत कार्यालय जिवाचीवाडी येथे महिला सरपंच श्रीम. प्रेरणा दीपक काळे व ग्रामपंचायत कर्मचारी इत्यादीने स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती साजरी केल्याचे दिसून आले प्रथम समई प्रत्यक्षात पाहणी केली असता ग्रामपंचाय अधिकारी,महिंद्र मुंडे यांच्यावर केलेली आहे. आरोप बिनबुडाचे व खोटे असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
चोकट
“स्वं.अजितदादा पवार यांची जयंती ग्राम पंचायत जीवाची वाडीत साजरी केली आहे”
श्रीम.प्रेरणा दीपक काळे,महिला सरपंच ग्राम पंचायत कार्यालय, जीवाची वाडी.
चौकट
” स्व.अजित दादा पवार यांची जयंती साजरी केली माझ्याकडे तिन सज्जे आहेत, त्या पैकी दोन अतिरीक्त असलेने मुख्यालयीन गाम पंचायत लिबाची वाडी येथे जयंती साजरी केली आहे. जीवाची वाडी ग्राम पंचायत सदस्य यांचे आरोप बिनबुडाचे व खोटे असल्याचे मुंडे यांनी आमच्या प्रतिनीधीशी भ्रमध्वनी वरून सांगितले.”
महिंद्र मुंडे, ग्राम विकास अधिकारी ग्रा. का. जीवाचीवाडी