केज/येवता:प्रतिनिधी:सा.वा.दि.२२रोजी केज तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जीवाची वाडी केंद्र लव्हूरी येथे स्व.अजित पवार यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथमत:स्व.अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पन करण्यात आले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.दरबारे/काळे धम्मादीपा मॅडम यांनी स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या कार्यावर उजाळा देत मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका श्रीमती दरबारे/काळे धम्मादीपा,श्रीम.संगिता मुंडे,श्रीम.शोभा चौरे,राजाभाऊ घोळवे,राजाभाऊ मुळे,गोकुळ सारूक,बब्रुव्हान चौरे,विकास चौरे विद्यार्थी पालक इत्यादी उपस्थित होते.