महाराष्ट्र

स्वाभिमानीच्या लढ्याला यश; ५ नोव्हेंबरपासून जायकवाडीतून गेवराई, माजलगावसाठी पाणी सुटणार!

भारतीय संघर्ष,

 

गेवराई! प्रतिनिधी
जायकवाडी धरणातून (नाथसागर) पैठण उजव्या कालव्याद्वारे आगामी ५ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्याचा दिलासादायक निर्णय प्रशासनाने घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेवराई आणि माजलगाव तालुक्यातील रब्बी पिकांना व मुक्या जनावरांना पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्यानंतर अखेर या आंदोलनाला मोठे यश आले आहे.


धरणात सध्या सुमारे ७४ टक्के जलसाठा उपलब्ध असतानाही पाणी सोडण्यास विलंब होत असल्याने शेतकरी चिंतेत होते. या पार्श्वभूमीवर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष दिनकर रिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाकडे आक्रमक मागणी केली होती. तसेच २६ ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. या पाठपुराव्याची दखल घेत अखेर प्रशासनाने ५ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
या यशस्वी लढ्यासाठी बीड जिल्हा युवा उपाध्यक्ष शेख खिजर जैनुद्दीन, माजलगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, महिला तालुकाध्यक्ष सुनिता गील, जयदेव शिंगने, बाळू डहाळे व इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. “हा विजय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक भूमिकेचा आणि शेतकरी एकजुटीचा आहे,” अशी प्रतिक्रिया संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर जैनोदीन यांनी दिली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना व रब्बी पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button