महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे व पीक प्रात्यक्षिकांसाठी महाडीबीटीवर अर्ज करावेत —————— गेवराईचे तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांचे आवाहन

भारतीय संघर्ष........

 

गेवराई : विष्णु राठोड ,

सन २०२६-२७ या वर्षात राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण उपअभियानांतर्गत (NFNSNM-NC) रब्बी हंगामासाठी रब्बी ज्वारी पिकाचे प्रमाणित बियाणे ५० टक्के अनुदानावर वितरित करण्यात येणार आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत असे आवाहन गेवराईचे तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी केले आहे.

या अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे वितरणासाठी १० वर्षांतील वाणांसाठी प्रति किलो ३० रुपये, तर १० वर्षांवरील वाणांसाठी प्रति किलो १५ रुपये अनुदान अनुज्ञेय आहे. तसेच पीक प्रात्यक्षिक घटकांतर्गत १०० टक्के अनुदानावर बियाणे वितरित करण्यात येणार आहे. या घटकांचा लाभ वैयक्तिक शेतकरी लाभार्थ्यांना देण्यात येणार असून, पात्र शेतकऱ्यांनी संबंधित घटकांसाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अभियानांतर्गत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, शेतकरी प्रशिक्षण, जिल्हास्तरीय कृषी महोत्सव यांसारखे विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. तसेच पात्र शेतकरी बांधवांनी प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिक योजनांचा लाभ घेण्यासाठी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Farmer Login करून ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज करताना आवश्यक माहिती अचूक भरावी व अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी गेवराई तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा संबंधित कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा असेही आवाहन कृषी विभागाच्या वतीने गेवराईचे तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button