महाराष्ट्र

महिला महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा,

भारतीय संघर्ष......

गेवराई! विष्णु राठोड
, दि. १५ : जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या महिला महाविद्यालय, गेवराई येथे ग्रंथालय व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. तात्याराम सोंडगे यांच्या हस्ते डॉ. एक.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शारदा विद्यामंदिर, गेवराई येथील शालेय विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास भेट देऊन विविध पुस्तकांची पाहणी केली. प्राचार्य डॉ. तात्याराम सोंडगे यांनी विद्यार्थ्यांना डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे जीवनकार्य, वैज्ञानिक योगदान आणि वाचनाचे महत्त्व विशद केले. वाचनामुळे ज्ञानवृद्धी, वैचारिक प्रगल्भता, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समिती व विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये कु. आरफा शेख हिने प्रथम, गुंजन धापसे हिने द्वितीय तर रेणुका जाधव हिने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थिनींना प्राचार्य डॉ. तात्याराम सोंडगे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास प्रा. डॉ. संजय भेदेकर, प्रा. डॉ. नामदेव शिनगारे, प्रा. डॉ. रामहरी काकडे, प्रा. डॉ. संदिपान किवणे, प्रा. डॉ. कैलास सावंत, प्रा. डॉ. राजाभाऊ चव्हाण, प्रा. डॉ. दत्ता तंगलवाड, प्रा. बाबु वादे व प्रा. डॉ. शिला कवडे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button