गेवराई! विष्णु राठोड
दि. २३ सप्टेंबर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई आणि निवडणूक विभाग, तहसील कार्यालय, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय मतदार नोंदणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत तहसील कार्यालय, गेवराई येथील समन्वयक श्री. गिरीश जोशी यांनी विद्यार्थ्यांना नवमतदार नोंदणी, मतदार यादीतील नावात बदल, दुरुस्ती तसेच मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच Special Intensive Revision (SIR) अर्थात विशेष सखोल पुनर्निरीक्षण या प्रक्रियेविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. नवीन मतदार नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, नोंदणीची प्रक्रिया आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. देविदास रिठे, प्रा. प्रदीप दहिंडे, प्रा. मीना नागवंशी, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी प्रा. अभिजीत तौर तसेच क्रीडा अधिकारी प्रा. अरुण भराडे यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत पांगरीकर, डॉ. सुनील भगत, डॉ. अमोल शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. देविदास रिठे यांनी केले, तर मराठी विभाग प्रमुख डॉ. समाधान इंगळे यांनी आभार मानले. कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Back to top button
