महाराष्ट्र

प्रा. व्हि.एस.इंदुलकर सर सेवानिवृत्त.

भारतीय संघर्ष न्यूज....

 

उरण दि ३(विठ्ठल ममताबादे )कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. व्ही.एस. इंदुलकर सर ३५ वर्षाच्या सेवा कालानंतर निवृत्त झाले. त्यातील १९९१ ते १९९३ पर्यंत जे एस एम कॉलेज अलिबाग येथे सुरुवातीची अडीच वर्ष वाणिज्य व्याख्याता म्हणून म्हणून सेवा केली. त्यांचे शिक्षण जे.एस. एम.कॉलेज अलिबाग येथे झाले. त्यानंतर म्हणजे डिसेंबर १९९३ ते ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत गेली ३३ वर्ष उरण महाविद्यालयात वाणिज्य विभाग प्रमुख सेवा पूर्ण केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कोकण ज्ञानपीठ संस्थेचे सीईओ प्रदीपचंद्र शिंगारपुरे हे होते. तर प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाचे डायरेक्टर प्रा. डॉ.बळीराम गायकवाड उपस्थित होते. प्रा.व्हि.एस. इंदुलकर हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ प्राध्यापक असून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवले असे सांगितले. गेली २५ वर्ष डी एल एल ई या विभागात योगदान दिले. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून चेंबूर सर्वांकष शिक्षण संस्था बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर चक्रधर हे उपस्थित होते. तर प्राचार्य चक्रदेव यांनी डी एल एल ई आणि वाणिज्य विभागातील त्यांचे विद्यापीठ पातळीवरचे कार्य ठसा उमटवणारे असल्याचे सांगितले. उरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मिक गर्जे यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना शिस्त आणि नियोजन त्यांच्याकडून शिकण्यासारखे असल्याचे प्रतिपादन केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीपचंद्र शृंगारपुरे यांनी कोकण ज्ञानपीठ संस्थेच्या विकासात त्यांनी दिलेली योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. डॉ. ए.आर.चव्हाण यांनी प्रा.इंदुलकर यांचा जीवन परिचय सांगितला. याप्रसंगी रमेश ठाकूर,शुभांगी जाधव मावशी, डॉ. आनंद गायकवाड, डॉ. एच के जगताप, डॉ.एम.जी. लोणे, कुमार विनय इंदुलकर, माजी विद्यार्थी मनोज ठाकूर, आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी कृतज्ञता भाव व्यक्त करताना प्रा. व्हि.एस इंदुलकर सर यांनी वर्तमान शिक्षण पद्धती,विद्यार्थ्यांची मानसिकता, त्यांच्या समोरील आव्हाने, रोजगाराच्या संधी , परदेशी विद्यापीठांची आव्हाने व स्पिरीचल शिक्षणाचे महत्त्व याविषयी आपले मत व्यक्त केले व सर्वांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त केला. याप्रसंगी शुभदा इंदुलकर, श्रीमती मीराताई पाटील, कवी राजेंद्र नाईक इत्यादी अनेक नातेवाईक व मित्र महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. पराग कारुळकर यांनी व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दत्ता हिंगमिरे यांनी केले. सेवानिवृत्ती कार्यक्रम सोहळा सिल्वर ओक रिसॉर्ट नागाव उरण येथे मोठया उत्साहात व उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button