गेवराई! विष्णु राठोड,
गेवराई तालुक्यातील घरकुल योजनेचे प्रलंबित हप्ते, रोजगार हमी योजनेतील अडचणी तसेच घरकुलधारक व गावकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या.
या पार्श्वभूमीवर आज गेवराई पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी यांची भेट घेऊन संबंधित समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मुकेश महाजन, शिवसेना शहर प्रमुख , गणेश पवार, सुनील ठोसर गोपालराव आहेर, परसराम मासाळ अशोक कदम , माऊली नवले, बालाजी करांडे जिजा खोसे, जनार्दन चौधरी यांच्यासह विविध गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.
घरकुलधारकांचे प्रलंबित हप्ते, रोजगार हमीच्या अडचणी व पंचायत समिती स्तरावरील इतर प्रश्न लवकरच शिवसेनेच्या वतीने आढावा बैठक घेऊन मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
पंचायत समिती स्तरावरील कोणत्याही अडचणी असलेल्या नागरिकांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, मोंढा नाका, गेवराई येथे संपर्क साधावा, असे आवाहन मुकेश आण्णा महाजन व सर्व शिवसेना नी करण्यात आले आहे.…
📞 संपर्क : 9923238923 | 9604535373
शिवसेना सदैव जनतेच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध!
Back to top button
