केज/ येवता:प्रतिनिधी :आप्पाराव सारूक दि.२९ रोजी केज तालुक्यातील– लव्हुरी-कोठी या गावचे जुने अनेक वर्षापासून अतिक्रमण करून शिव रस्ते बंद केलेले होते.दोन्ही ग्रावच्या शेतकऱ्यांनी अनेक वेळा रस्ता खुला करण्याची मागणी नियमा प्रमाणे तहसील कार्यालय,केज यांच्या कडे अनेक वर्षा पासुन होत असलेने.केजचे कर्तव्यदक्ष तहसीलदार,शुभम पवार यांनी आपल्या कर्मचारी फौज-फाट्यासह मस्साजोगच्या मंडळ अधिकारी,वैशाली देशमुख, ग्राम महसुल अधिकारी सज्जा,लव्हुरीचे ग्राम महसुल अधिकारी,अशोक चटप,भूमिअलेख कार्यालय,केजचे सुदाम चौरे,केज पोलीसांच्या बंदोबस्तात.शुक्रवारी दि.२९/०५/२०२६ रोजी लव्हुरी-कोठी येथील रस्ता अतिक्रमण कि.मी.खुले केले तसेच लव्हुरी येथील गट नं. ११०व १११ मधील पाच सर्वे नं. मधील अतिक्रमण खुले केले एकाच दिवसात पाच रस्ते खुले केल्याने शेतकऱ्यांचा जिव्हाळाचा प्रश्न सुटलेने कर्तव्यदक्ष मा.तहसीदार साहेब शुभम पवार यांचे शिस्तप्रिय व धाडसी अधिकारी म्हणुन सर्वत्र चर्चा होऊन सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
चौकट…..
आमच्या प्रतिनिधीने कोठी येथील सरपंच संपर्क साधला”रस्त्याचा प्रश्न सोडविला तहसीलदार शुभम पवार साहेबांचा भव्य सत्काराचे आयोजन करत आहे.
बप्पा डोंगरे,सरपंच,कोठी