महाराष्ट्र

गेवराईच्या सुनिल घाटुळ यांनी पूर्ण केली टाटा अल्ट्रा मॅरेथॉन….

भारतीय संघर्ष Live...

 

गेवराई प्रतिनिधी ! विष्णु राठोड

गेवराई येथील सुनिल घाटूळ यांनी लोणावळा येथील सह्याद्रीच्या द-याखोऱ्यात संपन्न झालेल्या प्रतिष्ठित टाटा अल्ट्रा मॅरेथॉन 2026 या स्पर्धेत 35 किलोमीटरचे खडतर आणि जीवघेणे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. आव्हानात्मक मार्ग आणि जीवावरची वळणे लोणावळ्याचा खडतर मार्ग त्यांच्या तीव्र चढावासाठी आणि जीव घेण्या वाळण्यासाठी ओळखला जातो. या सर्वांवर मात करत गेवराई सुनिल बप्पासाहेब घाटूळ यांनी स्वप्नवत वाटणारे हे लक्ष गाठून आपला ठसा उमटवला.
गेवराई येथील बाळराजे कंट्रक्शन चे यशस्वी उद्योजक अध्यक्ष तथा न्यूज चे कार्यकारी संपादक सुनिल बप्पासाहेब घाटुळ हे मागील सहा महिन्यापासून ग्राउंडवर रनिंग करत होते. त्यांनी आजवर महाराष्ट्रात होणाऱ्या अनेक मॅरेथॉन मध्ये भाग घेतलेला आहे. कुठे जरी मॅरेथॉन चे आयोजन केलेले असले याची माहिती त्यांना मिळताच ते त्या ठिकाणी अवश्य भाग घेतात नुकत्याच लोणावळा येथे टाटा अल्टो मॅरेथॉन 2026 चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुनिल घाटूळ यांनी भाग घेऊन अवघ्या 05:02:09 वेळामध्ये 35 किलोमीटरचे अंतर पार केले व आपला ठसा मॅरेथॉनमध्ये उमटवला त्यांच्या या यशामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत असून, या पुढील मॅरेथॉन मध्ये आणखी कमी वेळात जास्त अंतर पार करण्यासाठी मी आणखीन जास्त सराव करणार असल्याचे यावेळी बोलताना सुनिल घाटूळ यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button