श्री. प्रवीण खाडे सर,
कल्याण प्रतिनिधी …..
कांबा (दि. १३/२/२०२६) – श्री गजानन विद्यालय आयोजित स्काऊट-गाईड शिबिर निसर्गरम्य कांबा परिसरात उत्साहात पार पडले. शिबिराचे उद्घाटन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती प्रतिभा भालेराव मॅडम यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्काऊट चळवळीचे जनक Lord Baden-Powell व जागतिक गाईड चळवळीच्या प्रेरणास्त्रोत Lady Baden-Powell यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रार्थना, झेंडा गीत, वचन व नियमांनी वातावरण देशभक्तीने भारावले.
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी “प्रथम सोपान” अंतर्गत स्काऊट-गाईड भेळ उपक्रम सादर केला. विविध टाळ्यांचे प्रकार, कृतीयुक्त गीते, प्रथमोपचार पेटीची माहिती व आपत्कालीन प्रसंगांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सादर केले. तसेच गाठींचे प्रकार व त्यांचे उपयोग प्रभावीपणे दाखवून दिले.
कल्याण भारत स्काऊट-गाईड स्थानिक संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री. जगन्नाथ सपकाळे सर, चिटणीस मा. श्री. शशिकांत पाटील सर व कोषाध्यक्ष मा. श्री. दिलीप तडवी सर यांनी सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका सौ. कल्पना पाटील मॅडम यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शिबिरात एक आदर्श स्काऊट व एक आदर्श गाईड निवडण्यात आले. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांचन भालेराव मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सायंकाळी शेकोटी कार्यक्रमात संविधान, पर्यावरण, साक्षरता व स्वच्छता या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी संदेश दिले. शेकोटी गीत व नृत्याने वातावरण उत्साहमय झाले. वनभोजनानंतर शिबिराची सांगता झाली. या शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व, सेवाभाव व सामाजिक जाणीव दृढ झाली.
Back to top button
