गेवराई-विष्णु राठोड ,
बीड/गेवराई (प्रतिनिधी) अवघ्या महाराष्ट्रासह जिल्ह्यातील भाविकांच्या भक्तिला जागणारी व नवसाला पावणारी देवी म्हणून श्री क्षेत्र त्वरिता देवीची महती आहे. या ठिकाणी दूर-दूर वरुण भाविक भक्त हे दर्शनासाठी व आपण बोललेले नवस फेडण्यासाठी या ठिकाणी येतात. अनेकांनी या देवीची महती जानून घेतली असून विविध माध्यमातून या तीर्थक्षेत्राची माहिती देण्यात येत आहे,तलवाडा या ठिकाणी शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्सवात सुरुवात झाली असून प्रत्येक दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक येऊन दर्शन घेत आहेत.
गेवराई पासून पूर्वेकडे अवघ्या १०/१२ की.मी अंतरावर असलेल्या तलवाड़ा येथे श्री क्षेत्र त्वारिता देवी मंदिर आहे सध्या देवीचां नवरात्र उत्सव सुरु आहे. हा उत्सव नऊ दिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात येत असतो. एका उंच डोंगरावर त्वरिता देवी विराजमान झालेली असून पुरातन कालीन मंदिर बांधकाम करण्यात आले आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ मनाला भावातिल आशा चार दीपमाळा उभ्या असून त्या पूर्णपणे दगडी आहेत. मंदिर बांधकाम ही आकर्षक व भव्य दिव्य आहे, सुसज्य सभामंडप बांधकाम केलेले आहे. मंदिराच्या आतील भागात ही सर्व ठिकाणी व्यवस्थित असे जूने पुरातन दगडी बांधकाम असून विस्वस्थ मंडळामार्फत सर्व परिसरात रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच परिसर हा सी. सी. टी. व्ही च्या निगराणी खाली आहे. काहीही अनुचित प्रकार घडू नये व भाविक भक्तांना त्रास होऊ नये यासाठी विश्वस्थ मंडळचे पदाधीकारी हे या नऊ दिवसाच्या काळात रात्रंदिवस भक्तांच्या सेवेसाठी उभे असतात त्याच बरोबर पोलिस प्रशासनाचे कर्मचारी ही याठिकाणी आपले कर्तव्य बजावतात . स्थानिक नियामक मंडळ हे त्वरिता देवीचा परिसर स्वच्छ ठेवतात,भक्तांना त्रास होणार नाही याची काळजी त्याच्याकडून घेण्यात येते,या काळात डोंगरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून देवीच्या मुख्य रस्त्यावर ही दोन्ही बाजूनी रोषणाई केल्याने त्वरिता देवी मंदिर परीसर प्रकाशमय झाला आहे. त्वरिता देवीच्या पायथ्याशी गणपती मंदिर असून यात्रा भरते या जागेच्या दक्षिण दिशेला जय भवानी देवीचे मंदिर आहे. नवरात्र उत्सव काळात तसेच प्रत्येक वेळेस भाविक हे अगोदर जय भवानी देवीचे दर्शन घेतात व नंतर त्वरिता मातेचे दर्शन घेण्यासाठी निघतात. यात्रा परिसरात एक पुरातन कल्लोळ असून याची महती ही खुप आहे. जय भवानी देवीचे दर्शन घेऊन भाविक या कल्लोळमध्ये हात, पाय धूऊन डोळ्याला पाणी लावत आपल्या मनोकामना देवीच्या चरनी अर्पण करतात. त्वरिता देवीचे मंदिर जवळपास ३५० वर्षापूर्वीचे असून डोंगर माथ्यावर आहे. नवरात्र उत्सव काळात पहाटे तिन वाजल्या पासून रात्री बारा वाजेपर्यन्त भाविक भक्त दर्शनासाठी येतात. या उत्सव काळात अनेक भाविकाच्या नऊ दिवस देवीच्या मंदिरात मुक्काम असतो हे भाविक तेथे देवीचे गाणे, भारुड यासह विविध कार्यक्रम आयोजित करतात. तसेच विश्वस्त मंडळा मार्फत ही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून मागील तिन ते चार वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत होते परंतु यावर्षी अजून तश्या प्रकारचे कसले नियोजन आहे याची चर्चा नसल्याने यावरी रक्तदान शिबिर होणार की नाही याची कल्पना नाही परंतु नवरात्र या काळात तलवाडा देवीच्या विश्वस्त मंडळाकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात मंदिरावर पूर्ण सुविधा पुरवण्याचे काम विश्वास्थ मार्फत करण्यात येत आहेत.हा नऊ दिवसाचा उत्सव तलवाडा व तलवाडा परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो शेवटी दसऱ्या दिवशी होमाचे आयोजन करून सीमोल्लंघनाची जोरदार तयारी असते.