विष्णु राठोड/बीड गेवराई…
गेवराई तालुक्यातील जांभळी तांडा (जातेगाव) येथे
दि.१७ मे २०२६ रोजी बंजारा,भटक्या- विमुक्त समाजाच्या मान,सन्मान, न्याय, हक्क व अधिकारासाठी समर्पित बंजारा ब्रिगेडचा शाखा अनावरण सोहळा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात अतिशय उत्साहात पार पडला.
यावेळी बंजारा ब्रिगेडचे
संस्थापक अध्यक्ष रवीकांत भाऊ राठोड,प्रदेश उपाध्यक्ष सतीश भाऊ पवार, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर पवार,बीड जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ पवार यांच्यासह बीड जिल्हा व गेवराई तालुक्यातील बंजारा ब्रिगेडचे पदाधिकारी जांभळी तांडा मधील महिला पुरुषांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बंजारा ब्रिगेडचे जिल्हा सचिव प्रमोद राठोड,तालुका अध्यक्ष अमोल भाऊ राठोड, यांनी जांभळी तांडा शाखा कार्यकारणी चे पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.. बंजारा बिग्रेड भारत संस्थापक अध्यक्ष रवीकांत भाऊ राठोड , प्रदेश उपाध्यक्ष सतिश आमगोत, बीड जिल्हा अध्यक्ष योगेश राठोड,सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.