गेवराई! विष्णु राठोड
बीड जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पात कसल्या प्रकारची भरीव तरतूद निदर्शनास येत नाही. बीड जिल्हा बारामतीप्रमाणे करण्यात येईल हे अजित दादा चे स्वप्न पूर्ण होईल अशी अर्थसंकल्पात कसल्याही प्रकारची तरतूद निदर्शनास येत नाही. बीड जिल्हा सर्व क्षेत्रात मागास असून अद्याप पर्यंत दळणवळण, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा या क्षेत्रात जिल्हा मागास आहे. इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तरतूद झालेली आहे. परंतु बीड जिल्ह्यात अत्यंत अल्प प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद झाल्यामुळे बीड जिल्हा बारामतीप्रमाणे करण्यात येईल हे अजित दादाचे स्वप्न साकार होऊ शकत नाही.
जिल्ह्यासाठी औद्योगिक, दळणवळण, कृषी, सिंचन क्षेत्रासाठी, शैक्षणिक आदि क्षेत्रात बीड जिल्हा मागास आहे .तरी यापुढे अजित दादा चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरीव तरतूद होणे अत्यंत आवश्यक आहे याबाबत शासनाने गंभीरपणे विचार व्हावा ही विनंती
अनिल बोर्डे
बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष व ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्र गेवराई
-
मान्यवरांच्या हस्ते पदवी वितरण समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव ======================= कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ======================= गेवराई विष्णु राठोड गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील त्वरितापुरी कला, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पदवी वितरण समारंभ तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती सेवाभावी संस्थेचे ॲड .सुरेशराव हात्ते हे राहणार आहेत. तर गेवराईच्या तहसीलदार गीतांजली गरड आणि गेवराईचे पोलिस उपविभागीय अधिकारी अनिलजी कटके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कार्यक्रमास गेवराईचे गटविकास अधिकारी मधुकर बिलगे, गटशिक्षणाधिकारी मयूरजी मोदाणी तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिक्षण, प्रशासन आणि पोलीस विभागातील मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
August 24, 2026
Back to top button
