महाराष्ट्र

परभणी–मानवत महामार्गावर इनोव्हा पुलाखाली कोसळली; ५ ते ६ जण जखमी पहाटे पाचच्या सुमारास अपघात…….

भारतीय संघर्ष......

 

 

परभणी( प्रतिनिधी): परभणी ते मानवत दरम्यानच्या महामार्गावर बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास पुन्हा एकदा अपघात झाला. एमएच १२ डीवाय ०१०५ क्रमांकाची इनोव्हा कार पुलाखाली कोसळल्याने या अपघातात पाच ते सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या महामार्गावरील पुलाचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, काम सुरू असलेल्या पुलाजवळ आवश्यक दिशादर्शक फलक किंवा वाहनचालकांना सावध करणारी पुरेशी सूचना नसल्याने वाहनधारकांना पुलाचा अंदाज येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने पुलात पडण्याच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे.

परभणी–मानवत हा महत्त्वाचा महामार्ग असल्याने या मार्गावरून दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अशा वर्दळीच्या मार्गावर पुलाचे काम सुरू असताना योग्य दिशादर्शक फलक, बॅरिकेड्स आणि रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसणाऱ्या सूचना लावणे आवश्यक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या अपघाताच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणेने पुलाच्या ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. अन्यथा, अशा अपघातांमुळे आणखी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button