गेवराई! विष्णु राठोड
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील तीन मुलांनी 19 वयोगट व 17 वयोगटातून प्रथम बाजी मारत विभागासाठी त्यांची निवड झालेली आहे.. त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने मनापासून अभिनंदन करण्यात आले.
यामध्ये खालील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत चांगली कामगिरी करत भव्य यश संपादन केले आहे. यामध्ये
17 वर्ष वयोगट मधून कांबळे विश्वजित अंकुश याने 100 मीटर फ्री स्टाईल जलतरण प्रथम
200 मीटर फ्री स्टाईल जलतरण प्रथम तर 17 वर्ष वयोगट मध्ये लाड विश्वास विक्रम 400 मीटर फ्री स्टाईल जलतरण प्रथम
तर 800 मीटर फ्री स्टाईल जलतरण प्रथम तर 19 वर्ष वयोगट
मध्ये लाड युवराज विशाल
200 मीटर बेस्ट स्ट्रोक जलतरण
प्रथम
400 मीटर फ्रीस्टाइल जलतरण
प्रथम
800 मीटर फ्रीस्टाइल जलतरण
प्रथम आलेले आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. शिवाजीराव (दादा) पंडित, संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. अमरसिंहजी पंडित साहेब, संस्थेचे सचिव मा.श्री. जयसिंह पंडित साहेब, मा. आमदार श्री. विजयसिंहजी पंडित साहेब, शारदा क्रीडा अकॅडमीचे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी मा.श्री. रणवीर (काका) पंडित, मा.श्री. पृथ्वीराजे (दादा) पंडित, श्री अमृतजी डावकर सर , डॉ आसारामजी मराठे साहेब,संस्थेचे श्री गोरकर सर, श्री गोगुले सर ,तसेच शाळेचे प्राचार्य श्री हाटकर सर,पर्यवेक्षक श्री लाड सर , उच्च विभागाचे प्रमुख प्रा .दत्ता पाठक सर , प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती बोबडे मॅडम यांनी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे व पालक विक्रम लाड, अंकुश कांबळे व विशाल लाड यांचे मनापासून कौतुक केले आहे .
तसेच आगामी विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी विश्वजीत, विश्वास व विशाल यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी शाळेचे मुख्य क्रीडा शिक्षक श्री कृष्णा कदम सर यांचे व त्यांच्या पालकांचे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले.