महाराष्ट्र

आविष्कार स्पर्धेत अट्टल महाविद्यालयाचे उल्लेखनीय यश

भारतीय संघर्ष.....

 

गेवराई! विष्णु राठोड

दि. १० (प्रतिनिधी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्हा आविष्कार २०२६ स्पर्धा र. भ. अट्टल महाविद्यालयात नुकतीच संपन्न झाली.
या स्पर्धेत र. भ. अट्टल महाविद्यालयाच्या संघाने उल्लेखनीय यश संपादन केले. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान (Engineering and Technology) या विभागातून महाविद्यालयास दोन पारितोषिके प्राप्त झाली. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत संदीप आडे व प्राची आर्डे या दोन विद्यार्थ्यांची केंद्रीय आविष्कार स्पर्धेसाठी निवड झाली.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय अमरसिंह पंडित यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. रजनी शिखरे, उपप्राचार्य प्रा. विजय सांगळे, जिल्हा आविष्कार समन्वयक प्रा. मधुकर वाडीकर, प्रा. अतुल केचे, प्रा. स्वाती कुलकर्णी, प्रा. सौरभ गायकवाड उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button