महाराष्ट्र

नाना पाटेकर यांच्या निधनामुळे समाजसेवा क्षेत्राची मोठी हानी झाली – अमरसिंह पंडित नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून झालेल्या कामाची दुष्काळग्रस्त जनता सदैव जाणीव ठेवील

भारतीय संघर्ष......

गेवराई! विष्णु राठोड ( प्रतिनिधी )

प्रतिभावंत अभिनेता आणि संवेदनशील समाजसेवक नाना पाटेकर यांच्या अकाली निधनाचे वृत्त वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारे आहे. अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली, परंतु ज्या अभिनेत्याला सर्वसामान्य जनता आपला ‘हिरो’ मानते यापैकी काही मोजके लोक सामान्य जनतेप्रती आपले उत्तरदायित्व मानतात यापैकी एक ‘रियल हिरो’ म्हणून नाना पाटेकरांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत जोपासले. गेवराई तालुक्याच्या दुष्काळग्रस्त भागातील सिंचन सुविधा वाढविण्यासाठी त्यांनी अतिशय मोलाचे सहकार्य करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यांच्या निधनामुळे समाजसेवा क्षेत्राची मोठी हानी झाली अशी प्रतिक्रिया शारदा प्रतिष्ठान या सामाजिक स्वयंसेवी संस्थेचे कार्यवाही तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केली आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून झालेल्या कामाची दुष्काळग्रस्त जनता सदैव जाणीव ठेवील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गेवराई विधानसभा मतदार संघातील अनेक गावांत नदी, नाले आणि ओढ्यांचे खोलीकरण, सरळीकरण आणि रुंदीकरण करण्यासह तलाव आणि बंधाऱ्यातील गाळ काढून सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी नाम फाऊंडेशन आणि शारदा प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे काम केले. गेवराई सारख्या सततच्या आवर्षण प्रवन दुष्काळग्रस्त भागात नाम फाऊंडेशनने केलेली मदत दुष्काळग्रस्त जनता कधीही विसरणार नाही. सामाजिक जाणीव आणि दूरदृष्टी असलेला हा समाजसेवक अकाली निघून गेल्यामुळे समाजसेवा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. आता निर्माण झालेल्या भिषण दुष्काळ परिस्थितीत त्यांच्या जाण्यामुळे पुन्हा एकदा ‘दुष्काळ पडल्याची भावना’ अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केली आहे. नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल त्यांनी तिव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button